मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दुपारी २ वाजता त्यांचा पक्षात प्रवेश होईल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. यामुळे भाजपाला मोठा हादरा बसला आहे.
ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी करणार राष्ट्रवादीत प्रवेश
दरम्यान, त्यांनी निर्णय घेतल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंत्री आणि माजी आमदार राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किंमत मिळणार नाही. त्यांच्यासोबत कोणताही नेता राष्ट्रवादीत जाणार नाही असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, ‘ खडसेंनी आता जी हिंमत केली आहे, त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही.’