Lok Sabha Election 2024 । कोल्हापूर लोकसभेला महाविकास आघाडीकडून करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
अशात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी मागील संदर्भ देत जाहीर माफी मागितली. ते सभेत बोलतांना म्हणाले,’ मी संभाजीराजे यांच्याबद्दल चुकलो असेल तर जाहीर माफी मागतो, असं म्हणत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला होता. मात्र त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पराभव पत्कारावा लागला होता. याच गोष्टीचा संदर्भ देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली. सभेत बोलतांना ते म्हणाले,’आम्हीं शेण खाल्ल म्हणुन तुम्ही शेण खाताय? तुम्ही आता काय करतायं?’ असा खडा सवालही त्यांनी विचारला आहे
हे वाचले का ? चित्रा वाघ यांचा घणाघात,’राज्यात पब, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?’