मुंनाई – बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने जबरदस्त डान्स परफॉर्मन्स करत अनेक चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या आहेत. “दिलबर’ गाण्यापासून ते “गर्मी’ गाण्यापर्यंत तिने आपल्या डान्स आणि आपल्या अदांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.
दरम्यान, आता नोराचा नवा अल्बम लाँच झाला आहे. या अल्बमध्ये ती गुरु रंधावासोबत झळकली असून, अल्बम प्रदर्शित होताच युट्युबवर तब्ब्ल सहा लाख लाईक केला आहे. “नाम मेरी रानी” असं या म्युझिक अल्बमचे नाव आहे. या अल्बममध्ये नोराचा डान्स पाहण्यासारखा आहे. नोरा फतेहीने नेहमीच आपल्या दिलखेच डान्सने फॅन्सला घायाळ करत आली आहे.