मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून माध्यमांशी बोलताना टीका केली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेवरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली होती. त्यांनी राज्याचे राजकारण कुठल्या थरला चालले आहे यावर टीका टीका केली होती.त्यांच्या याच टीकेला आता संजय राऊतांनी त्यांच्या रोखठोक अशा शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी उत्तर देताना, “केशवराव हे फालतूचे धंदे बंद करा! रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही.संपूर्ण क्लिप दाखवा आणि कॉमेंट करा. महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात. असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल. जय महाराष्ट्र!” असे म्हटले आहे.
केशवराव
हे फालतू चे धंदे बंद करा!
रेटून खोटे बोलण्याची तुमची फॅक्टरी जनताच बंद केल्याशिवाय राहणार नाही.
संपूर्ण क्लिप दाखवा.आणि कॉमेंट करा..महाराष्ट्राचे राजकरण खालच्या थराला नेणारे तुम्ही लोकच आहात.असेच खोटे बोलत राहिलात तर जनता रस्त्यावर उतरून तुमचे थोबाड फोडेल.
जय महाराष्ट्र! https://t.co/f7C39HWeqh— Sanjay Raut (@rautsanjay61) January 16, 2023
दरम्यान, केशव उपाध्ये यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना, ‘महाराष्ट्राच राजकारण कोणत्या थराला नेत आहात संजय राऊत? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल ही भाषा? एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचा अपमान आपण करत आहात. मतभेद असू शकतात पण ही भाषा? संजय राऊत माफी मागा महाराष्ट्राची. असे ट्वीटद्वारे म्हटले होते.
राऊत साहेब खोट बोलण्याचा प्रश्नच नाही. आपण शब्द वापरला की नाही? आपण मुळात पत्रकार संपादक, त्यात खासदार आपल्याला राग व्यक्त करायला अशी भाषा वापरावी लागते यापेक्षा महाराष्ट्राच दुदैव काय? आणि दुकान जनतेने कुणाचं बंद केल हे दिसतय की. त्यातून ही चिडचिड, शिव्या.. https://t.co/MzpfLQBTY0
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 16, 2023
या ट्वीटसोबत केशव उपाध्ये यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत. मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे दिसून येते.