नगर – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह निवासस्थानी झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने मार्केट यार्ड चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या घटनेचा निषेध नोंदविला.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, अंकुश मोहिते, रोहित केदारे, संतोष लोखंडे, महेश आठवले आदी उपस्थित होते. या घटनेमागील सूत्रधाराचा शोध घेण्याची मागणी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली आहे.