नवी दिल्ली – पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर भागात रविवारी पहाटे एका निवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा मृत्यू झाला, असे दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही दुर्घटना पहाटे २.३५ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा नगरमधील एक निवासी इमारतीला पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून, अन्य काही जण जखमी झाले आहेत.
या जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच १३ जणांना वाचविण्यात यश आले आहे, अशी माहिती अग्िनशमन दलाकडून देण्यात आली.