पिंपरी, (प्रतिनिधी) – संकष्ट चतुर्थीनिमित्त चिंचवड येथील महानसाधू मोरया गोसावी मंदिरात दर्शनासाठी गणेशभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. संकष्ट चतुर्थी व सार्वजनिक सुट्टीचा दुहेरी योग जुळुन आल्याने गणेशभक्तांची गर्दी अधिक असल्याचे दिसून आले. तर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर स्टॉल लावल्याने या परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते.
दरम्यान, मंदिरात खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला. त्याच बरोबर श्री मोरया सभामंडपात रक्तदान शिबीर आणि नेत्र तपासणीला सुध्दा भाविक चांगला प्रतिसाद मिळाला.अलोट गर्दीमुळे श्रीं च्या दर्शनासाठी गणेशभक्तांना सुमारे एक तासाचा अवधी लागत होता. दुपारी १२ च्या सुमारास गर्दी वाढत असल्याने आणि मंडपात जागा नसल्याने काही रांगा उन्हात थांबलेल्या दिसत होत्या.
बप्पाच्या दर्शनासाठी लहान मुलांन पासून जेष्ठ नागरिकां पर्यंत सर्वच दिसत होते. दर्शन रांगेतच मोरया मोरया गणपती बप्पा मोरया असा गजर करत, तसचे बप्पाचे दर्शन घेताचा दोन तासाचा थकवा निघुन गेल्याचे भाविकांनी सांगितले.