वॉशिंग्टन – मायक्रोसॉफ्ट या जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनीचे इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊझर 26 वर्ष सेवा दिल्यानंतर आता रिटायर होणार आहे. 15 जून 2022 नंतर इंटरनेट एक्सप्लोररची सेवा बंद होणार आहे.
बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. एक्सप्लोरर बंद झाल्यानंतर मायक्रोसोफ्ट एज हे वेब ब्राउझर त्याची जागा घेणार आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचा इंटरनेट एक्सप्लोरर हा पहिला यशस्वी ब्राउजर होता त्याची सेवा ही मोफत पुरवण्यात येत होती.
इंटरनेट एक्सप्लोरर मुळेच लोकांना इंटरनेटचा वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन होऊ शकले लॉन्चिंग नंतर पहिले दहा वर्षे जगातील 95 टक्के लोक फक्त इंटरनेट एक्सप्लोरर चा वापर करत होते.
सध्या इंटरनेट एक्सप्लोररचा वापर करणारे यूजर्स दहा टक्केच राहिल्याने कंपनीला हे ब्राउझर बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. पोलीस प्रशासनाला आणि शैक्षणिक संस्थांना इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊझरचा विशेष उपयोग झालेला आहे.
सरकारी संस्था आणि वित्तीय कंपन्या अजूनही इंटरनेट एक्स्प्लोरचा वापर करीत आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनी ते 16 ऑगस्ट 1995 रोजी इंटरनेट एक्सप्लोरर ची घोषणा केली होती.
त्यानंतर 2002 मध्ये मोझिला फायरफॉक्स लॉंच झाले त्यामुळे इंटरनेट एक्सप्लोरर ची लोकप्रियता कमी झाली 2008 मध्ये गूगल क्रोम लॉन्च. झाले तेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर अशी लोकप्रियता एकदमच कमी झाली जगात सर्वात जास्त यूजर्स क्रोम हेच ब्राउझर वापरले जात आहे.
खरे तर इंटरनेट एक्सप्लोरर हा ब्राऊझर जगातील सर्व कॉम्प्युटर्स आणि लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल असतात. गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स प्रमाणे इंटरनेट एक्सप्लोरर ने स्वतःला अपडेट न केल्यामुळेच त्यांचे यूजर्स कमी झाले आणि अखेर मायक्रोसॉफ्टला आहे हे ब्राउझर बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला