मॉस्को – नवरा आणि बायको यांच्या तीळ भांडण ही काही नवी गोष्ट नसली तरी, ही भांडणे जर टोकाला गेली तर कोणालातरी जीव गमवावा लागतो याचे उदाहरण मॉस्को शहरात समोर आले.
१०१ किलो वजन असलेल्या पत्नीने रागाच्याभरात भांडणानंतर पतीच्या चेहर्यावर बसकण मारल्याने जीव घुसमटून पतीचा जीव गेल्याची घटना घडली आहे. या वजनदार पत्नीचे नाव टाटियाना असे असून पतीचे नाव एडर असे आहे.
काही महिन्यांपासून त्यांच्यामधील भांडणे वाढत असल्याने ते घटस्फोट घेणार होते पण घटस्फोटांच्या अटी आणि शर्ती ठरवणार यावरून त्यांच्यात संवाद सुरू असतानाच या संवादाचे भांडणात रूपांतर झाले. आणि काही अटी मान्य करून घेण्याच्या निमित्ताने टाटियानाने आपल्या पतीला खाली पाडले आणि त्याच्या चेहऱ्यावर बसून ती त्याच्याकडून वदवून घेऊ लागले
एकशे एक किलो वजनाची पत्नी चेहऱ्यावर बसल्याने त्याचा श्वास गुदमरला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला मला श्वास घेता येत नाही. ये तू उठ असे अनेक वेळा सांगूनहीती न उठल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला माझ्या पतीला ठार मारण्याची इच्छा नव्हती अपघाताने माझ्या हातून ते कृत्य घडल्याचे नंतर तिने सांगितले आहे. पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.