ऑलिम्पिक टेस्ट इव्हेन्ट हॉकी स्पर्धा : भारतीय महिलांचा जपानवर विजय

टोकियो – येथे होत असलेल्या ऑलिम्पिक टेस्ट इव्हेन्ट हॉकी स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारतीय महिलासंघाने यजमान जपान महिला संघाचा 2-1 असा पराभव करत विजयी सलामी दिली.

यावेळी सामन्याच्या नवव्या मिनिटालाच भारताच्या गुर्जीत कौरने पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत भारतीय संघाचे गोलचे खाते उघडले. मात्र सामन्याच्या 16व्या मिनिटालाच यजमानांच्या संघातील आघाडीवीर आकी मित्सुहासीने मैदानी गोल करत जपानला सामन्यात 1-1 अशी बरोबरी करुन दिली.

यानंतर बराच वेळ सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामनाबरोबरीत सुटेल असे वाटत असताना गुर्जीत कौरने 35व्या मिनिटाला आणखीन एका पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करत संघाला 2-1 अशी आघाडी
मिळवून दिली.

यानंतर यजमानांकडून गोल करण्याचे बरेच प्रयत्न झाले. मात्र, भारतीय संघाच्या बचाव फळीने आत्मविश्‍वासाने खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखत सामना 2-1 अशा फरकाने आपल्या नावे केला.

Leave A Reply

Your email address will not be published.