Shoaib Akhtar | पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आणि त्याची पत्नी रुबाब खान तिसऱ्यांदा पालक बनले आहे. त्यांच्या घरी आज 1 मार्च रोजी एका गोंडस चिमुकलीचे आगमन झाले आहे. या चिमुकलीचे नाव दोघांनी नूरेह अली अख्तर ठेवले आहे. अख्तर हे आधीच दोन मुलांचे वडील आहे. शोएब अख्तरच्या मोठ्या मुलाचे नाव मोहम्मद मिकेल अली आणि लहान मुलाचे नाव मोहम्मद मुजद्दीद अली आहे, त्यांचा जन्म अनुक्रमे 2016 आणि 2019 मध्ये झाला होता.
आपल्या मुलीचे स्वागत केल्यानंतर, अख्तरने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर चाहत्यांसह हि गुड न्युज शेअर केली. आणि त्याने आपल्या मुलीसाठी सर्वांचे आशीर्वाद आणि प्रार्थना मागितल्या.
शुक्रवारी, शोएब अख्तर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये तो आपल्या मुलीला आपल्या मांडीवर घेतलेला दिसतो आणि कॅप्शनमध्ये लिहिले, या गुड न्यूज बाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, शोएब अख्तरने 2014 मध्ये रुबाब खानसोबत खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हरिपूर येथे कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह केला होता. त्यावेळी अख्तरच्या लग्नाची खूप चर्चा झाली कारण त्याची पत्नी 20 वर्षांची होती आणि माजी पाकिस्तानी गोलंदाज 38 वर्षांचा होता.
४८ वर्षीय अख्तरने २०११ विश्वचषक संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटतून रिटायरमेंट घेतली . सध्या अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेटशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपले मत मांडताना दिसत आहे.