Hardik Pandya And Sonu Sood| मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यावर मागील काही दिवसांपासून वारंवार टीका केली जात आहे. पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या हार्दिक पांड्याच्या नव्या टीमने ‘आयपीएल 2024’ मध्ये आतापर्यंत दोन्ही सामने गमावले आहेत. यावरून त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. यावर अभिनेता सोनू सुदने हार्दिक पांड्याला पाठिंबा देत एक पोस्ट शेअर केली आहे.
सोनू सूद पोस्ट Hardik Pandya And Sonu Sood|
सोनू सूदने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘आपण आपल्या खेळाडूंचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूंमुळे आपल्याला देशाचा अभिमान वाटतो, जे खेळाडू आपल्या देशाची मान उंचावतात. एके दिवशी तुम्ही त्यांचा जयजयकार करता, तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना चिडवता. यामुळे ते नव्हे तर आपण अपयशी ठरतोय. मला क्रिकेट आवडतो. माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक क्रिकेटपटू मला आवडतो. तो कोणत्या फ्रँचाइजीसाठी खेळतोय याने मला फरक पडत नाही. तो कर्णधार म्हणून खेळतोय की संघातील तो 15 वा खेळाडू आहे, यानेही मला फरक पडत नाही. ते आपले हिरो आहेत’, असं सोनू सूदने म्हटले आहे.
सोनू सूदने त्याच्या या पोस्टमध्ये हार्दिक पांड्याचा उल्लेख केला नाही. मात्र त्याची ही पोस्ट हार्दिकला केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगविरोधात असल्याचं स्पष्ट होतंय. सोनू सूदने खेळाडूंचा आदर करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, आयपीएल 2024 च्या आधी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार बनवले. Hardik Pandya And Sonu Sood|
We should respect our players. Players who made us proud, players who made our country proud. One day you cheer for them, next day you boo them.
It’s not they, it’s us who fail.
I love cricket.
I love every cricketer who represents my country.
Doesn’t matter which franchise…— sonu sood (@SonuSood) March 29, 2024
दरम्यान, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याने चाहते नाराज आहेत. त्यातच मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या दोन्ही सामन्यांदरम्यान हार्दिक पांड्याला स्टेडियमवर देखील प्रचंड ट्रोल करण्यात आले. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सोनूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, तो ‘फतेह’ चित्रपटात दिसणार आहे. ‘फतेह’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता यांनी केले असून यात जॅकलिन फर्नांडिसही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा: