‘सेक्रेड गेम्स-2’ ऑनलाइन लीक

मुंबई- स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) नेटफ्लिक्‍सवर बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’चं दुसरं पर्व प्रदर्शित करण्यात आलं आहे. या वेब सीरिजच्या निमित्ताने गणेश गायतोंडे आणि गुन्हेगारी विश्वाची एक नवी बाजू प्रेक्षकांना पाहता आली. सध्या सेक्रेड गेम्स-2 ला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सेक्रेड गेम्स-2 ही वेब सीरिज ऑनलाइन लीक झाली आहे. त्यामुळे आता निर्माता कंपनीची झोप उडाली असून, कंपनीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. मेसेजिंग अॅप टेलिग्रामसह इतर अनेक वेबसाइटवर सेक्रेड गेम्स-2चे पायरेटेड व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पायरेटेड कॉन्टेंटच्या क्वालिटीतही फारसा फरक दिसून येत नाही. यापूर्वी देखील ‘सॅक्रेड गेम-1’ देखील नेटफ्लिक्सवर आल्यानंतर काही दिवसांत ऑनलाइन लीक झाला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.