पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांची पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश नुकतेच राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेत क्रीडा अधिकारी ही दोन पदे आहेत.
एक पद हे पदोन्नतीने भरले जाते. तर दुसरे पद हे नामनिर्देशित असते. या पदावर राक्षे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारकडे याबाबत अभिप्राय सादर केल्यानंतर क्रीडा अधिकारी पदासाठी शैक्षणिक अर्हता शिथिल करण्याच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यावर राक्षे यांना नियुक्त करून घेण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकेस दिले आहेत.