पिंपरी – नाताळचा सण अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असून शहरात कॅरल सिंगिंग आणि विविध कार्यक्रमांतून ख्रिस्ती बांधव भेटीस येत आहेत. शहरात सायंकाळी अचानकच सांताक्लॉज भेट देत आहे. त्यामुळे भेट वस्तू घेऊन आलेला सांताक्लॉज पाहून चिमुकल्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
नाताळच्या सणानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील चर्चना रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठाही सजावटीच्या साहित्याने सजल्या आहेत. त्यामुळे दहा दिवस आधीच वातारणा निर्मिती झाली आहे. त्यात ख्रिस्ती बांधव घरोघरी जाऊन कॅरल सिंगींग म्हणत आहेत. तर, काही ठिकाणी सांताक्लॉजच्या वेश परिधान करून छोट्या-मोठ्या मुलांना खाऊ देत आहेत.
अचानक आलेल्या या सांताक्लॉजमुळे मुले हरखून जात असून अनपेक्षीत मिळालेल्या भेटवस्तूंनी मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. शहरात ठिकठिकाणी सांताक्लॉजचा वेश परिधान करून अनेकजण भेटवस्तू वाटप करताना दिसत आहेत.
अचानक सांताक्लॉजच्या भेटीने मुले हरखून जात आहेत. सांताक्लॉज या मुलांची संवाद साधत आहेत. त्यांच्याशी हात मिळवत आहेत. त्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणीत होत आहे. निगडी परिसरात सायंकाळनंतर हे सांताक्लॉज भेटवस्तू देताना दिसत आहेत.