T20 World Cup 2024 :- जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. यामध्ये 20 संघ खेळणार आहेत. यातील 11 संघांनी आत्तापर्यंत या मेगा स्पर्धेसाठी आपापले संघ घोषित केले आहेत. टीम इंडियाला वगळले तर उर्वरित 10 पैकी 5 संघांमध्ये भारतीय वंशाच्या 22 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
यजमान अमेरिकेकडे कर्णधार मोनांक पटेलसह भारतीय वंशाचे सर्वाधिक 8 खेळाडू आहेत. कॅनडाचे 7 तर ओमानचे 4 खेळाडू आहेत. तर दक्षिण आफ्रिका संघ आणि २ खेळाडू न्यूझीलंड संघात आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकन संघाचा कर्णधार मोनांक पटेल, मिलिंद, सौरभ आणि कॅनडा संघाचा परगट सिंग बीसीसीआयच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळले आहेत. मोनांकने गुजरातकडून अंडर-16 आणि अंडर-18 क्रिकेट खेळले आहे. अमेरिकन संघातील मिलिंद आणि सौरभ यांनीही रणजी ट्रॉफी खेळली आहे. कॅनडाचा परगट सिंगही पंजाबकडून रणजी खेळला आहे.
मध्यमगती गोलंदाज असलेल्या 32 वर्षीय सौरभने रणजी स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. 2010 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा भाग होता. ज्यात तो के.एल. राहुलसोबतही खेळला. तर, 31 वर्षीय अयान मध्य प्रदेशकडून सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी खेळला आहे.
T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकादरम्यान दहशतवादी हल्ल्याचा धोका..! पाकिस्तानातून मिळाली धमकी
कुठल्या संघात भारतीय वंशाचे खेळाडू?
अमेरिका : मोनांक पटेल, हरमीत, जायसी, मिलिंद कुमार, निसर्ग, नितीश, नोष्टुष आणि सौरभ.
कॅनडा : दिलप्रीत बाजवा, हर्ष ठाकर, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, परगट सिंग, रविंदरपाल सिंग आणि श्रेयस मोव्वा.
ओमान : कश्यप प्रजापती, प्रतीक आठवले, अयान खान आणि शोएब खान.
द. आफ्रिका : केशव महाराज.
न्यूझीलंड : रचिन रवींद्र