Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. अशात सत्तेत असलेल्या भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजप पक्षातील हायप्रोफाईल नेत्यांसह कलाकारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. अशात लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपचे हरियाणातील लोकसभा खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच त्यांचे वडील आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह हे देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यापूर्वी त्यांनी रविवारी भगवा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
ब्रिजेंद्र सिंह म्हणाले, ‘राजकीय कारणामुळे मला भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मी पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांचे आभार मानतो.” ब्रिजेंद्र सिंह हे माजी केंद्रीय मंत्री बिरेंद्र सिंह यांचे पुत्र असून त्यांच्या कुटुंबाचा काँग्रेसशी दीर्घकाळ संबंध आहे. कुलदीप बिश्नोई यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ब्रिजेंद्र सिंह यांचे तिकीट कापण्याची धमकी दिली जात होती. याशिवाय जेजेपी युतीमुळे चौधरी बिरेंद्र सिंह यांचे कुटुंबीयही भाजपवर नाराज होते. शेतकरी आंदोलन, अग्निवीर आणि महिला कुस्तीपटूंच्या मुद्द्यावरून ब्रिजेंद्र सिंह संतापले होते.
हेही वाचा
टीएमसीने सर्व 42 जागांवरील उमेदवार यादी केली जाहीर, क्रिकेटर युसूफ पठाणला बहरामपूरचे दिले ‘तिकीट’