ओझर (प्रतिनिधी) – श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाच्या सभेतून बाळासाहेब कवडे यांची ट्रस्ट च्या अध्यक्षपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी तुषार कवडे सचिव पदी सुनील घेगडे तर खजिनदार म्हणून दत्तात्रय कवडे यांची एकमताने निवड झाली. श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अष्टविनायकांपैकी एक अतिपवित्र असे तीर्थक्षेत्र आहे.
या ठिकाणी प्रती पाच वर्षाने ग्रामसभा घेवून विश्वस्त निवड केली जाते. सन २०२४ ते २०२९ कालावधीसाठी दिनांक ३ मार्च रोजी ग्रामसभेतून विश्वस्त निवड झाली तर आज दि १० मार्च रोजी विश्वस्त मंडळाच्या सभेतून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,खजिनदार पदांची निवड करण्यात आली.
देवस्थान ट्रस्ट भाविकांना विविध सुखसाई निर्माण करत असते तसेच देवस्थान ट्रस्ट मागील तीन वर्षापासून मोठ्या प्रमाणात विकासकामे करत आहे.प्रस्तावित काही विकास कामे बाकी आहेत ती पूर्ण करण्याचे काम प्रथमता करणार असल्याचे बाळासाहेब कवडे यांनी सागितले.
देवस्थान ट्रस्ट चे माझी अध्यक्ष गणेश कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जी धार्मिक कामे सुरु आहेत ती या पुढील काळात सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्ष गणेश कवडे यांनी प्रामुख्याने भव्य महादेव मंदिराचे काम सुरु करण्याबाबत मत मांडले त्याला एकमताने मंजुरी देत अध्यक्ष यांनी प्रथमता महादेव मंदिराच्या कामापासून सुरुवात करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी विश्वस्त सुर्यकांत रवळे, प्रकाश मांड, विनायक मांडे, मंगेश पोखरकर, संतोष कवडे, समीर मांडे, विनायक जाधव, विक्रम कवडे, विलास कवडे, गोविंद कवडे, शिल्पा जगदाळे, अजित कवडे, कैलास घेगडे, मंगेश मांडे, संतोष मांडे, विकास कवडे, मीरा जगदाळे, मोहन कवडे, सरपंच जगन्नाथ कवडे, यांची उपस्थिती होती. विद्यमान पदाधिकारी यांचा सत्कार मा,अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आला.