नगर,(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वैध उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची सोमवार (दि.२९) ही शेवटची तारीख आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. त्यानंतर निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहिले, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
नगर लोकसभा मतदार संघाच्या छाननी प्रक्रियेत ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून ६ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले. तर शिर्डी मतदार संघात ३१ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले तर ९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये उमाशंकर श्यांमबाबु यादव (बहुजन समाजपार्टी), नीलेश ज्ञानदेव लंके (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार), सुजय राधाकृष्ण विखे (भाजप), गोरख आळेकर (अपक्ष), डॉ. योगिता चोळके (अपक्ष), सूर्यभान लांबे (अपक्ष), जहीर जकाते (अपक्ष), प्रा. सुनीलराव पाखरे (अपक्ष), शिवाजीराव डमाळे (सैनिक समाज पार्टी),
कलीराम पोपळघट (भारतीय नवजवान सेना पक्ष), शितोळे सुदर्शन (हिंदू एकता आंदोलन पार्टी), शेकटकर अनिल (अपक्ष), मुक्ता साळुंके (इंन्सारनियत पार्टी), मदन सोनवणे (राईट टू रिकॉल पार्टी), आरती हालदार (प्रबुद्ध रिपब्लीाकन पार्टी), दिलीप खेडकर (वंचित बहुजन आघाडी), नीलेश साहेबराव लंके (अपक्ष), रावसाहेब काळे (बहुजन मुक्तीप पार्टी), गंगाधर कोळेकर (अपक्ष), प्रविण दळवी (अपक्ष),
मनोरमा दिलीप खेडकर (अपक्ष), बिलाल शेख (अपक्ष), प्रतिक बारसे (अपक्ष), राणी लंके (अपक्ष), परवेज शेख (ऑल इंडिया मजलिस-इत्तेळहादुल मुस्लिमीन), कैलाश जाधव (महाराष्ट्र विकास आघाडी), भागवत गायकवाड (समता पार्टी), ॲड. महंमद शेख (अपक्ष), वाबळे बापूराव (भारतीय जवान किसान पार्टी), नवशाद शेख (अपक्ष), दत्तात्रय वाघमोडे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), गिरीश जाधव (अपक्ष), कोठारी लिलाचंद (राष्ट्रीय जनमंच एस), अमोल पाचुंदकर (अपक्ष), महेंद्र शिंदे (अपक्ष), गावडे मच्छिंद्र (अपक्ष) यांचा समावेश आहे.
शिर्डी येथील वैध ठरलेल्या २२ उमेदवार – भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे), लोखंडे सदाशिव (शिवसेना), चंद्रकांत दोंदे (अपक्ष), अभिजीत पोटे (अपक्ष), भारत भोसले (समता पार्टी), नितीन पोळ (बहुजन भारत पार्टी), बागुल गोरक्ष (अपक्ष), अॅड. सिध्दार्थ बोधक (अपक्ष), अशोक आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी),
सतीश पवार (अपक्ष), संजय भालेराव (अपक्ष), रामचंद्र जाधव (बहुजन समाज पार्टी), उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी), गंगाधर कदम (अपक्ष), भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष), प्रशांत निकम (अपक्ष), खरात नचिकेत (अपक्ष), संजय खामकर (बळीराजा पार्टी), राजेंद्र वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), रवींद्र स्वामी (अपक्ष), खाजेकर विजयकुमार (अपक्ष) व सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष) असे आहेत.