नगर -समाजात काम करतांना सर्वसामान्य लोकांना आपण केलेली मदत ही कोणत्याही अपेक्षा न ठेवता केली पाहिजे. समाजासाठी अहोरात्र झटणारे कल्याण दळे यांच्या कार्याची जाणिव ठेवूनच आम्ही देखील समोरच्यांची गरज ओळखून मदत करीत आहोत, ती कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांनी केले.
नगर जिल्हा बारा बलुतेदार महासंघाच्यावतीने सावेडी, उपनगरातील तसेच तालुक्यातील सकल नाभिक समाजातील बांधवांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बाळासाहेब भुजबळ, गोकूळ मगर, सुनिल पंडित, विक्रम सोनवणे, शहाजी कदम, दिलीप मगर, मुरलीधर मगर, शिवाजी दळवी, बबन भुजबळ, किशोर राऊत, सोमनाथ कदम, अमोल घोडके, शाम औटी, अविनाश जाधव, अनिल इवळे, रमेश बिडवे, श्रीपाद वाघमारे, अनिल तोरडमल, प्रताप गुरव आदी उपस्थित होते.