नगर – जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील नियोजित शहीद स्मारक येथे कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, शिवाजी कर्डीले, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक सुनिल त्रिंबके, बाळासाहेब पवार, निखिल वारे, नगरसेवक संपत नलवडे, गोविंद मोकाटे, भाजप शहराध्यक्ष भैय्या गंधे, तुषार पोटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, मनसुक वाबळे, संतोष पवार, विनोद परदेशी, भरत खाकाळ, ऍड. पोपट पालवे, ऍड.संदीप जावळे, आरपीआयचे संघटक सिद्धार्थ सिसोदे, संतोष आव्हाड, नंदु पालवे, राजेंद्र कर्डीले, जनार्धन जायभाये उपस्थित होते.
शिवाजी कर्डीले यांच्या पुढाकाराने शहीद स्मारक व संग्राहलयासाठी 18 गुंठे जागा देण्यात आली आहे. युवकांना देशसेवेत जाण्यासाठी प्रेरणा देणारे हे शहिद स्मारक उभे राहणार आहे. या नियोजित ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. शहिद स्मारक मध्ये स्थल सेना, वायु सेना, नौ सेनेत भरती होण्यासाठी युवकांना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.