किव्ह – युक्रेनमधील बाखमत शहराच्या पूर्वेकडील भागात युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. रशियाला सैन्य पुरवठा करणाऱ्या वॅगनर गटाने ही माहिती दिली आहे.
रशियाचे सैन्य दोनेत्सक प्रांताच्या पूर्वेकडील बाखमत शहरावर गेल्या अनेक महिन्यांपासून ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. रशियाने गेल्या फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केल्यापासून ही लढाई सर्वाधिक मोठी आणि रक्तपात घडवणारी ठरली आहे. युक्रेनला पाश्चात्य देशांकडून शस्त्र आणि दारुगोळ्याचा पुरवठा होत असतानाही रशियाने बाखमत शहराच्या पूर्वेकडील भागावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे.
अट्रेनमोवस्कच्या उत्तरेकडूल भागातील प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक घरात युक्रेन आणि रशियाच्या सैन्यामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे, असे वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगोनी प्रिगोझीन यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या ताब्यातून काही भाग आपल्या ताब्यात घेतल्यानंतर रशियाने या भागाला बाखमत म्हणून संबोधणे बंद केले आहे. मात्र या निवेदनासाठी प्रिगोझीन यांनी “बाखमत’ असाच शब्दप्रयोग वापरला आहे. युक्रेनचे सैन्य माघार घेत असल्याचे वृत्त पुढे आले होते. मात्र ते तसे नसून युक्रेनचे सैन्य अखेरपर्यंत लढण्याच्या पवित्र्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.
China/Taiwan : चेक प्रजासत्ताकच्या ‘त्या’ निर्णयाने चीनचा थयथयाट
आपले सैन्य जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत बाखमतच्या बचावासाठी लढणार असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी शुक्रवारी संध्याकाळी व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले होते. गेल्या आठवड्याभरापासून रशियाच्या सैन्याला अल्प यश मिळते आहे.
बाखमतचा संपर्क तुटत चालला आहे….
डोनबासमधील बाखमत शहराला वेढा घालण्याचा रसियाचा प्रयत्न असल्याचे ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. युक्रेनच्या सैन्याच्या दोन मुख्य रस्त्यांवर रशियाच्या सैन्याचा धोका कायम आहे. त्यामुळे बाखमत शहराचा संपर्क दिवसेंदिवस तुटत चालला आहे. दरम्यान खारकिव्ह शहरातील एका रहिवासी इमारतीवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये चौघेजण जखमी झाले आहेत.