Grandfather angry । आज लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. राज्यातील ११ जागांवर आज मतदान होत आहे. त्यातच सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणून बारामती लोकसभा मतदार संघाकडे पहिले जात आहे. याठिकाणी पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. म्हणजे मविआच्या सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. मात्र बारामती लोकसभा मतदार संघात ईव्हीएम वर कमळाचे चिन्ह नसल्याने एका आजोबांचा संताप झाल्याचेसमोर आले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात देखील मतदान होत आहे. दरम्यान पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानादरम्यान एक आजोबा संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ईव्हीएम मशीनवर कमळाचे चिन्ह नसल्याने संताप Grandfather angry ।
त्याच कारण म्हणजे ईव्हीएम मशीनवर कमळाचे चिन्ह नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.
मतदान न करताच बाहेर Grandfather angry ।
संतप्त आजोबा मतदानासाठी आत गेले मात्र मतदान न करताच बाहेर पडले. त्यांना ईव्हीएम मशीनवर कमळ चिन्ह दिसत नसल्याने त्यांनी चिडचिड केली. तसेच जर मतदान असेल तर कमळ चिन्ह असायला हवं असा त्यांचा दावा होता. यावरून मतदार जाऊनही गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे दिसत आहे.