Supriya Sule meets Ajit Pawar । बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. पवार कुटुंबातील उमेदवार एकमेक्नाच्या समोर आल्यामुळे ही निवडणूक देशपातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद-भावजय निवडणुकीच्या रिंगणात आहेत.दरम्यान, आज सकाळी सुप्रिया सुळे या मतदान केल्यानंतर लगेच अजित पवारांच्या घरी गेल्यामुळे तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
काकीच्या घरी आलोय Supriya Sule meets Ajit Pawar ।
अजित पवार यांच्या घरी सुप्रिया सुळेंनी सकाळी मतदानानंतर भेट दिली. पवार कुटुंबातील सर्वांनी बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर समोर आलेल्या या घडामोडीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या घरातून बाहेर पडताना सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण आपल्या काकीच्या घरी आलोय असे म्हणत अजित पवार यांचे नाव घेण्याचे टाळले.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी याठिकाणी येण्याविषयी,” आशाकाकींना (अजित पवार यांच्या आई) भेटायला आल्याचं सांगितलं. “मी आशाकाकींना भेटायला आले होते. एका सशक्त लोकशाहीत मतदान हे जबाबदारीचं काम असतं. आशाकाकी अतिशय जबाबदारीने मतदानाला आल्या. मी फिरत फिरत इथे भेटायला आले. हे आमचं नेहमीचंच रुटीन आहे. थोड्या वेळापूर्वी सुमती काकीही मला भेटल्या. प्रतापकाका, आशाकाकी अशा आमच्या घरातल्या वरीष्ठांची आम्ही नेहमीच भेट घेत असतो”,असे माहिती दिली.
काकी सोडून कोणाचीही भेट झाली नाही Supriya Sule meets Ajit Pawar ।
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी भेट दिली तेव्हा अजित पवारही घरात उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. अजित पवारांचीही भेट घेतली का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता आपली इतर कुणाशीही भेट झाली नसल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. हे आपल्या काकींचं घर असून तिथे आपण कधीही येऊ शकतो असं सांगतानाच काकींना भेटून मी लगेच निघाले, असंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. “जेवढं माझ्या आईनं माझं केलं नसेल, तेवढं मोठ्या काकी, आशा काकी, सुमती काकी आणि भारती काकींनी केलं आहे”, असंही त्या म्हणाल्या.