प्राग (चेक प्रजासत्ताक) – चेक प्रजासत्ताकच्या नियोजित अध्यक्षांनी चीनला आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. चेक प्रजासत्ताकचे नियोजित अध्यक्ष पीटर पॉवेल यांनी चीनचा आक्षेप धुडकावून तैवानशी संबंध प्रस्थापित करण्याचा निर्णय गेतला आहे.
तैवानच्या अध्यक्षा त्साई इंग यांच्याशी त्यांनी या आठवड्यात फोनवरून चर्चा केली. चेक प्रजासत्ताकच्या आतापर्यंतच्या कोणत्याही अध्यक्षांनी तैवानशी जवळचे संबंध प्रस्थापित केले नव्हते. त्यामुळे चीनचा थयथयाट सुरू झाला आहे.
चेक प्रजासत्ताकच्या नियोजित अध्यक्षांनी चीनला विश्वासात न घेता थेट तैवानसी संपर्क साधण्याचा निषेध आहे, अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
IMF : पाकिस्तानला दिलासा नाहीच; नाणेनिधीने Pakistan चा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला
“एक चीन’ या तत्वाचे पालन करण्याची चेक प्रजासत्ताकची आतापर्यंतची बांधिलकी होती. मात्र पीटर पॉवेल यांच्या या कृतीमुळे या तत्वाचे उल्लंगन झाले आहे, असेही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.