ukraine army – रशियाविरोधातल्या युद्धात सैन्याची कमतरता जाणवू लागल्यामुळे युक्रेनच्या संसदेने सैन्य भरतीसाठीचा एक वादग्रस्त कायदा मंजूर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून रशियाच्या आक्रमाणाला तोंड देत असलेल्या युक्रेनच्या सैन्यावर प्रचंड ताण आला आहे.
रशियाने युक्रेनचा जवळपास पाव टक्के भूभाग बळकावला आहे. यापैकी बराच भूभाग युक्रेनने परत मिळवला असला तरी यासाठी युक्रेनचे बरेच सैन्य खर्ची पडले आहे. मनुष्यबळ आणि शस्त्रांची मोठी टंचाई युक्रेनमध्ये जाणवते आहे.
सैन्याची टंचाई भरून काढण्यासाठी युक्रेन सरकारने सैन्य भरतीसाठीचा हा नवीन कायदा मंजूर केला आहे. अध्यक्ष झेलेन्स्की यांची स्वाक्षरी झाल्यानंतर महिन्याभराने हा कायदा अंमलात आणला जाणार आहे.
मात्र झेलेन्सकी या कायद्यावर स्वाक्षरी कधी करणार आहेत, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र त्याची अंमलबजावणी झाल्यावर त्यावर टीका होण्याची शक्यात अधिक असल्याचे मानले जाते आहे.
अलिकडेच मंजूर झालेल्या आणखीन एका कायद्यानुसार सैन्य भरतीसाठी किमान वयाची मर्यादा २७ वरून २५ वर्षे करण्यात आली आहे. या कायद्यावर स्वाक्षरी करण्यासाठी देखील झेलेन्सकी यांना अनेक महिने लागले होते.
रशियाने हल्ले तीव्र केले असतानाच युक्रेनने सैन्यभरतीसाठीचा हा वादग्रस्त कायदा मंजूर केला आहे. रशियाने युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर देखील हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना तोंड द्यायला युक्रेनला किमान ५ लाख सैनिकांची आवश्यकता आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून सैन्यातील भरती टाळण्याची प्रवृती वाढली आहे. त्यामुळे नवीन कायद्यानुसर दुष्काळग्रस्त भागातील युवकांना सर्रास सैन्य भरती करून घेतले जाणार आहे.
मात्र याला विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. ही सैन्य भरती देखील युक्रेनला अधिक सैन्य मिळवून देऊ शकणार नाही, असे निरीक्षकांचे मत आहे.