Lok Sabha elections 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज, ७ मे रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 93 जागांवर मतदान होत आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत 280 हून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झालेले असेल, म्हणजे एकूण लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर निर्णय झालेला असेल. उर्वरित चार टप्प्यात 263 मतदारसंघात मतदान होणार आहे.
#WATCH | Ahmedabad, Gujarat: Adani group chairman Gautam Adani shows his inked finger after casting his vote for #LokSabhaElections2024 at a polling booth in Ahmedabad pic.twitter.com/XgmNY0ql1E
— ANI (@ANI) May 7, 2024
दरम्यान, प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान केल्यानंतर अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही लोकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, ‘आज लोकशाहीचा सण आहे. मी लोकांना आवाहन करतो की, बाहेर पडा आणि मतदान करा. भारत पुढे जात आहे आणि पुढे जात राहील.”
हे वाचलं का ?
ईव्हीएमवर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबांचा संताप ; म्हणाले,”मशीनवर कमळ हवंच..”
शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल ; शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं मतदान
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
अजित पवार म्हणाले,’ही तर सुरुवात..अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत’
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात