Lok Sabha elections 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज, ७ मे रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 93 जागांवर मतदान होत आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत 280 हून अधिक मतदारसंघांमध्ये मतदान झालेले असेल, म्हणजे एकूण लोकसभेच्या निम्म्याहून अधिक जागांवर निर्णय झालेला असेल. उर्वरित चार टप्प्यात 263 मतदारसंघात मतदान होणार आहे.
पत्रकार परिषद #Live https://t.co/P547dk7lUX
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
अशात रोहित पावर यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले,’अजितदादा मित्रमंडळाकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करण्यात आलं. भोरला गाडी फोडण्यात आली, त्यात पैसा होता. मावळचे आमदार, नेते आणि त्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते त्या गाडीत पैसे घेऊन होते.’ ते पुढे म्हणाले ईडी, सीबीआयने अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या ज्या कारखान्यांवर कारवाई केली, त्यांचे कर्मचारी फिरत होते” असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय.
“बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झालं. काही ठिकाणी प्रत्येक मतासाठी 2500 रुपये, काही ठिकाणी 3 हजार रुपये, काही ठिकाणी 4 हजार रुपये वाटले गेले. जात, धर्म, गरीब, श्रीमंत बघून पैसा वाटला गेला” असा आरोप रोहित पवार यांनी केला.
हे वाचले का ?
ईव्हीएमवर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबांचा संताप ; म्हणाले,”मशीनवर कमळ हवंच..”
गौतम अदानी मतदान केल्यानंतर म्हणाले,”भारत पुढे जात आहे आणि पुढे जात राहील”
हातकणंगलेत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मतदान काही काळासाठी ‘बंद’