Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी ९३ जागांवर मतदान होणार आहे. या कालावधीत 17 कोटी 24 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यादरम्यान महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रातील निम्म्या जागांवरील (२४) मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल. तिसऱ्या टप्प्यात बारामती, सातारा, माढा, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. त्या जागांसाठी एकूण २५८ उमेदवार रिंगणात आहेत.
अशात हातकणंगलेत धैर्यशील माने, सत्यजित पाटील व राजू शेट्टी यांच्यात अटीतटीची लढत आहे. याच मतदार संघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे महायुतीचे उमेदवार धीर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला.
साखराळे गावातील बूथ क्रमाक 62,63 वर हा प्रकार घडला आहे. केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर या दोन्ही गटात जोरात बाचाचची आणि जोरदार हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. मतदान केंद्र क्रमांक 62 आणि 63 वर सत्यजित पाटील सरूडकर यांचे बोगस प्रतिनिधी याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करत धैर्यशील माने यांच्या गटाने मतदान केंद्र काही काळ बंद ठेवले होते.
Lok Sabha elections 2024 । हे वाचले का