Girish Mahajan On Thackeray-Pawar। लोकसभा निवडणूक जशी जवळ येतीय तशी राज्यातील राजकीय घडामोडी घडताना दिसतायत. त्यातच भाजप नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी शिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी असं खुलंआव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं असंही महाजनांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना भाजपने पहिल्यांदाच ओपन चॅलेंज दिलंय. गिरीश महाजन हे यवतमाळमध्ये माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान मोदींच्या सभेवर महाविकास आघाडीने टीका केल्यानंतर महाजन यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान मोदी देशभर फिरतात, आज त्यांचा तीन राज्यांमध्ये दौरा आहे. या गोष्टींवर कुण्या शेंबड्या पोरांचाही विश्वास बसणार आहे का की, पंतप्रधान मोदी हे उद्धव ठाकरेंना घाबरले आहेत आणि म्हणून मोदीजी महाराष्ट्रात येतायत.असे त्यांनी म्हटलं.
‘त्यांनी’ किमान एक जागा निवडून आणावी Girish Mahajan On Thackeray-Pawar।
तसेच ” आम्ही सांगितलंय 400 पार करायचंय, मी त्यांना सांगतो की, त्यांनी किमान एक जागा निवडून आणावी, पवार साहेबांनी लेक सुप्रिया सुळेंची जागा निवडून आणावी. उद्धव ठाकरेंनी एखादी जागा निवडून आणावी. उगाच मी वाघ आहे, असं दाखवायचं. मांजराने वाघाचं कातडं घातल्यासारखा हा प्रकार आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटलांवर निशाणा Girish Mahajan On Thackeray-Pawar।
‘मनोज जरांगे ज्या अविर्भावामध्ये मोदींची सभा होणार नाही, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत, पंतप्रधान मोदींना एकेरी भाषेमध्ये बोलत आहेत. परवा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना अर्वाच्य शिवीगाळ केली, ती कुणालाही आवडणारी नाहीय. त्यांना असं वाटतंय की, मी म्हणेल ती पूर्व दिशा. मला वाटतं या सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात आहे, त्यातून त्यांनी बाहेर पडावं’, असं म्हणत त्यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा
जाहीर सभा मोदींची पण खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे ; नेमकी सभा कोणाची ?