पुणे – उद्योगाच्या उच्चशिखरावर विराजमान होऊनही माणिकचंद ग्रुपचे संस्थापकअध्यक्ष श्री. रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांनी नेहमीच आरएमडी फाऊंडेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी विविध योजना, कार्यक्रम राबविलेले आहे. मग ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, शाळा महाविद्यालयाची उभारणी असो किंवा गरिब रुग्णांना त्यांच्या आजारपणात आर्थिक मदत असो, सर्वसामान्य लोकांच्या मदतीलाच नेहमी अग्रक्रम असायचा, असे मत आरएमडी फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा शोभाताई रसिकलाल धारीवाल यांनी दिली.
दिनांक १ मार्च २०२४ रोजी श्री. रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जसेकी, एम.बी.बी.एस., आयुर्वेद, डेंटलसर्जन, फिजिओथेरपी, नर्सिंग ,पॅरामेडिकल, पॅथॉलॉजी इत्यादीअभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सायंकाळी ५ वाजता शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत होणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत माणिकचंद हाऊस बंगला नं . ६४ ,लेन नं . ३ ,कोरेगाव पार्क, पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याचे व पुणे शहरवासीयांनी रक्तदान करण्यास जरूर यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.