भोर – तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काल मतदान सुरळीत पार पडले. प्रशासन रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळी मध्ये तेरा मतदान केंद्रांवर मतदान झाले. मतदान प्रक्रियेसाठी २१० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ४२ पथके तयार करण्यात आली होती.
आज सोमवारी सकाळी ९.३० वाजता मत मोजणीला भोर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सुरूवात झाली. मतदानासाठी ११ झोनल ऑफिसर आणि ११ सहाय्यक जोनाल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांच्या ३१ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत.तर सरपंच पदाच्या १३ जागांसाठी ४२ उमेदवार आहेत.
तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे कंसात मतदारांची संख्या – दापकेघर (३२०), शिरवली हिमा (७६४), हिर्डोशी (६०५), वडतुंबी (१२५०), वरोडी ब्रु. (५२८), पळसोशी (८०३), वरोडी खुर्द (७३३), नाटंबी (८९४), करंजे (७०६), महुडे खुर्द (१२१०), जयतपाड (७४९), कांबरे ब्रु (४३२) आणि माळेगाव (६६५).
निकाल
भोर तालुक्यातील पहिला निकाल हाती आलेला आहे. राष्ट्रवादी पक्षाचा (अजित पवार गट ) सरपंच विजय झाला आहे. नाटंबी गावचा हा निकाल आहे. पद्मावती देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या मतदारसंघातील भोर तालुक्यातील पहिला अजित पवार गटाचा सरपंच विजय झाला आहे.