वाघोली – ओडिया सांस्कृतिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कुमार महोत्सव २०२३ वाघोली येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवात समृद्ध अशा सांस्कृतिक परंपरेचा अनुभव नागरिकांनी घेत वाघोली सह खराडी चंदन नगर परिसरातील सुमारे 2000 परिवारांनी या कुमार महोत्सव 2023 मध्ये सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमासाठी ओडिसाचे विज्ञान आणि औद्योगिक मंत्री अशोक पांडा, पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कुमार महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात पुणे आणि ओडिसा मधील नागरिकांनी सांस्कृतिक परंपरेच्या मनोरंजक कार्यक्रमांचे प्रदर्शन केले. ओडिसा भागातील स्वादिष्ट भोजन परंपरेचा आस्वाद देखील यावेळी नागरिकांनी घेतला.
या उपक्रमासाठी अरुण राऊत, अशोक लेका, बीराज मिश्रा, मोनालीसा रथ, जयप्रदा बिस्वाल, प्रज्ञा दास, प्रशांत बिस्वाल, प्रशांत मिश्रा, प्रशांत मोहपात्रा, अस्मिता पटनायक, सुस्मिता महापात्रा, बिंता नायक, चंद्रभानू कानूगो, सुशील दास, रमाकांत साहू, सुसाजीता राय, देवब्रत पत्रो, दीपक साहू, सूर्य मोहन्ती, मानस साहू, श्री निरूप, स्वागतीका द्विवेदी, प्रदीप पाणी यांनी परिश्रम घेतले.
“ओडिसा राज्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा जपण्यासाठी ओरिसा बांधवांनी वाघोली मध्ये कुमार महोत्सवाचे आयोजन करून सामाजिक एकतेचा आणि बांधिलकीचा संदेश दिला आहे. देशातील वेगवेगळ्या परंपरांचा अभिमान बाळगण्यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी ठरत आहेत. – रामभाऊ दाभाडे, माजी सदस्य, जिल्हा परिषद पुणे.