मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे या दोघांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. तेव्हापासून हे जोडपे सतत चर्चेत राहिले आहे. लवकरच ही जोडी लग्न करणार असल्याची देखील चर्चा रंगली होती. मात्र आता मुग्धा आणि प्रथमेशने चाहत्यांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. या दोघांच्या साखरपुडयाचे फोटो समोर आले आहेत.
मुग्धा-प्रथमेशने इन्स्टाग्रामवर त्यांच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. दोघांचा साखरपुडा ५ नोव्हेंबरला पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे. या फोटोमध्ये दोघांचाही पारंपरिक लूक पाहायला मिळत आहे. मुग्धाने केशरी रंगाची कॉटनची साडी, गळ्यात हार असा साधा-सुंदर लूक केला होता. तर, प्रथमेशचा सदरा, डोक्यावर टोपी या मराठमोळ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुग्धा-प्रथमेशने या रोमँटिक फोटोंना “वाङ्निश्चय…” असे कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
मुग्धा-प्रथमेशच्या पोस्टनंतर दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेकाही महिन्यांपूर्वी प्रथमेश-मुग्धाने ‘आमचं ठरलंय’ म्हणत सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. यानंतर दोघांचाही साखरपुडा झाला असून चाहते त्यांच्या लग्नाचीही आतुरतेने वाट पाहत आहे.