जमैका – वेस्ट इंडिजचा आक्रमक क्रिकेटपटू युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल याने माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू रामनरेश सरवान याची माफी मागितली आहे. एका मुलाखतीत गेलने सरवानवर अत्यंत हिन शब्दात आरोप केले होते. त्यावेळी गेलवर कारवाई करण्याचे संकेत वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने तसेच कॅरेबियन प्रीमिअर लीग समितीने दिले होते. त्यामुळे गेलने माफी मागितली आहे.
अर्थात त्याने आपला हेका कायम ठेवला असून सरवानबाबत जे बोललो ते सत्य आहे मात्र येत्या काळात जबाबदारीने वर्तन करीन असे गेलने मंडळाला कळवले असून त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
या स्पर्धेतील जमैका तलयवाज संघातून आपल्याला सरवानमुळेच बाहेर काढले असा आरोप करताना गेलने सरवानला तू करोनापेक्षा भयंकर आहेस असे म्हटले होते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार होती.