जातीपातीला, धर्माला थारा नाही : प्रा. राम शिंदे

कर्जत  – गोळ्या- बिस्किटे वाटून झाल्यानंतर आता यांनी दुसरीच यादी करायला सुरुवात केली आहे. फोन नंबर, बॅंकेचे नंबर, आधार कार्ड घेतले. तेलाचा डबा, साखर, घरात किती लोक आहेत. हो, दिवाळीच. पण यांचं दिवाळं काढून नाही लावलं कर्जत- जामखेडने तर बोला.

यांच्याअगोदर अनेकांना वाटेला लावले आहे. ही पाचवी केस आली आपल्याला हाताळायला असे म्हणत प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांना टोला लगावला. कर्जत तालुक्‍यातील भांबोरा येथील गावभेट दौऱ्यात ते बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले, जातीपातीला, धर्माला, कुणालाही कसलाही थारा नाही. आपण आता एकविसाव्या शतकात आहोत. लोकांना वाटतंय हा मला ओळखतोय ना, हरकत नाही. अस काही असतं तर नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाले असते का? काही जमलं नाही तर माणूस त्यावर येतो असे म्हणत शिंदे यांनी जातीच्या राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी राजेंद्र देशमुख, अल्लाउद्दीन काझी, कांतीलाल घोडके, डॉ. सुनिल गावडे, सरपंच अशोक चव्हाण, उपसरपंच कालिदास गावडे, रावसाहेब लोंढे, नितिन पाटील, वसंत लोंढे, गोपीनाथ जगताप,भैय्यासाहेब पाटील, प्रा. संतोष रंधवे, औंदुबर जगताप, संतोष वायकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

त्यानंतर शिंदे यांनी खैदानवाडी गावास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील मुलींनी भारतीय जनता पार्टीला समर्थन म्हणून त्यानुसार वेषभूषा करून औक्षण केले. दशरथ सायकर, नाना सायकर यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा व महायुती मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.