Pune Loksabha Election| भाजपकडून पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पुण्यात महायुतीची प्रचार रॅली होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील, मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे उदय सामंत हे नेते या रॅलीत सहभागी झाले आहेत.
मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी मोहोळ यांनी आईचे आशीर्वादही घेतले आहेत. याशिवाय त्यांनी पुण्याच ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर कोथरूड मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीतील घटक पक्षांनी हजेरी लावली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या रॅलीत मोठ्या संख्येने भाजपसह, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी देखील हजेरी लावली आहे. Pune Loksabha Election|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात Pune Loksabha Election|
दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी पुण्यात सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि केंद्रीय मंत्री आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला संध्याकाळी पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सभा घेणार आहेत.
हेही वाचा:
शिरुरमधून अमोल कोल्हेंच्या विरोधात लढण्यासाठी भुजबळांना होती ऑफर? स्वत: केला खुलासा