इंदापूर (प्रतिनिधी)- डॉक्टर व्यवसाय हा पूर्ण वेळ समाजाला वाहून घेतलेला व्यवसाय आहे. लोकसेवा ही मध्यवर्ती भूमिका ठेवून आपण सर्व काम करता. हे कौतुकास्पद कार्य आहे. संसदेत डॉक्टर यांच्यासाठीचे विशेष कायदे सुरक्षा कायदा बनवणेस पूर्ण पाठपुरवठा करू. तसेच इंदापूर मेडिकल असोसिएशनला भविष्यतील कार्याला पूर्ण सहकार्य करू. अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
इंदापूर शहरातील डॉक्टर संघटनेसोबत खासदार सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनी लोकसभेच्या प्रचारार्थ संवाद मेळावा यशस्वी केला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, आम्ही पूर्ण ताकदीने डॉक्टर संघटनेसोबत उभे राहू. डॉक्टर लोकांना सशक्त करणे म्हणजे एक प्रकारे समाजाव्यवस्था मजबूत करणे आहे.
सीएसआर फंडचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी योग्यरित्या करणे गरजेचे आहे. याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. अविनाश पाणबुडे, डॉ. सुहास शेळके, डॉ. लहू कदम, डॉ. समीर मगर, डॉ नामदेव गार्डे, डॉ. सागर दोशी, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. मंगेश पाटील, डॉ. शिवाजी खबाले, डॉ. अनिल पुंडे, डॉ. सचिन बिचकुले, डॉ. महेश रुपनवर, डॉ. रोहिदास थोरवे, डॉ. सचिन तोरवे, डॉ. अमोल रासकर,
डॉ. मनोज वाघमोडे, डॉ. उदय कुरूडकर, डॉ. यतिन शिंदे, डॉ. पंकज गोरे, डॉ. अनिरुद्ध गार्डे, डॉ. समीर मुलाणी, डॉ. सुधीर तांबिले, डॉ. अर्जुन नरुटे, डॉ. मनोजकुमार शिंदे, डॉ. उदय फडतारे, डॉ. निलेश कुंभार, डॉ. लक्ष्मण सपकाळ इंदापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. कल्पना खाडे, उपाध्यक्ष डॉ. प्रतिभा वणवे, डॉ. सुचिता जहागिरदार, तसेच शितल बोरा, अनिल पवार, ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक डॉ. रियाज पठाण यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनिल शिर्के यांनी केले.