Beed Lok Sabha Election 2024 – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा डागल्या जात आहेत. प्रत्येक पक्ष जोरदार सभा घेत आहेत. महायुतीच्या बीडमधील (Beed) उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अशाच एका सभेदरम्यान एक मोठं वक्तव्य केलं आहे. नाशिकमधून ( Nashik) प्रीतम मुंडेंना (Pritam Munde) उमेदवारी देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीमधील नाशिक लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यातच शिंदे गटाचे नेते हेमंत गोडसे याचे नाव चर्चत आहे. अशातच पंकजा मुंडेंनी केलेले हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी रडून मतदान मागणार नाही, गोपीनाथ मुंडे व्हायची माझी औकात नाही, मला पंकजा मुंडेच राहू द्या, असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.
यावेळी भावनिक झालेल्या पंकजा मुंडे यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. मला बीडमधून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रीतम मुंडेंचे काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण प्रीतम मुंडे यांची काळजी करु नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले आहे. बीडमध्ये लोकसभेच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.