लोणावळा – येथील आगवाली चाळ रेल्वे कॉलनी मधील संभाजी क्रीडा गणेश मंडाळाच्या आतमधील मंडपात तीन पत्ती हा जुगार खेळत बसलेल्या आठ जणांवर लोणावळा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल रईस नजीर मुलाणी यांनी फिर्याद दिली आहे.
प्रकाश कन्हैया जेथे (वय 32), सुभाश रामचंद्र चव्हाण (वय 55), मिलींद गोपाळ पडवळ (वय 58, तिघेही रा. रेल्वे कॉलनी, आगवाली चाळ, लोणावळा), राजु भाऊराव भोसले (वय 50, रा. वलवण, लोणावळा), मंगेश बबन आमले (वय 43, रा. डोंगरगांव), हेमंत सदाशिव घारे (वय 42, रा. गवळीवाडा, लोणावळा), उल्हास महादेव घारे (वय 48, रा. जिजामाता नगर, लोणावळा) आणि सुरेश केरबा वाघमारे (वय 45, रा. क्रांतीनगर, हनुमान टेकडी, लोणावळा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गणेशोत्सवात चालणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरिक्षक सीताराम डूबल यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा शहर पोलीस व गुन्हे अन्वेषण पथकाने रात्रगस्त वाढविली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा अशाच गस्तीवर असताना एक वाजण्याच्या सुमारास स.पो.नि. राहुल लाड यांच्या पोलीस पथकाला आगवाली चाळ रेल्वे कॉलनी मधील संभाजी क्रीडा मंडळ गणेश मंडाळाचे आतमधील मंडपात काहीजण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर अचानक छापा टाकून मुद्देमालासह सर्वांना ताब्यात घेतले.पुढील तपास हनुमंत शिंदे करीत आहेत.