तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – नगरपरिषद हद्दीमध्ये रस्त्यावर केबल टाकण्याचे काम करताना खोदकाम केले जाते आहे. हे काम त्वरित थांबवावे अशी मागणी माजी नगरसेवक अरुण माने यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांचे एन. के.पाटील यांच्याकडे केली आहे.
अरुण माने यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे शहरांमध्ये एम.एन.जी.एल. कंपनीकडून गॅसचे पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच काही भागांमध्ये लाइटच्या केबलचे काम सुरू आहे. तळेगाव शहरांमध्ये अनेक वर्षापासून रस्ते अतिशय खराब रस्ते होते. काही महिन्यापूर्वी हे रस्ते नव्याने बनवण्यात आलेले आहेत.
नव्यानेच बनवलेल्या रस्त्यावरती पुन्हा खोदकाम सुरू केले आहे. हे काम झाल्यानंतर पुन्हा रस्त्यांची दुरावस्था होणार आहे. रस्ते तयार करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले आहेत. त्यामुळे आपण हे काम थांबवावे. असे निवेदनात म्हटले आहे.