पिंपरी, (प्रतिनिधी) – खान्देश मराठा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू- वर पालक परिचय मेळावा निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाला. प्रमुख पाहुणे धुळे जिल्हा रुग्णालयाचे माजी आरोग्य अधिकारी डॉ प्रतिक देवरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर पगार, पाध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष सयाजी पाटील, सचिव प्रदीप शिंदे, खजिनदार भास्कर पाटील, कार्यकारणी सदस्य मिलिंद पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील,कृष्णराव अहिरराव आणि मार्गदर्शक समिती सदस्य बी.के.पाटील, माधव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ देवरे यांच्या हस्ते वधू वर सूची प्रकाशन केले. मंडळाचे सचिव प्रदीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय माधव पवार यांनी करून दिला. वधू वर यांचा परिचय पत्रक वाचन मिलिंद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी तर आभार एस आर पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनंजय पाटील, रवींद्र पाटील, ज्ञानेश्र्वर एंडाईत, ज्ञानेश्र्वर पाटील, चेतन ठाकरे, अशोक पाटील, राजेंद्र देसले, राखी पाटील, दिपाली पाटील, सुनीता पाटील यांनी विशेष सहकार्य केले.