नवी दिल्ली : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणे चांगलेच महागात पडले आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत प्रियांक खरगे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याने देशभरात गदारोळ माजला आहे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी एका कार्यक्रमात बोलताना सनातन धर्म संपवण्याची भूमिका मांडली होती. “सनातन धर्म हा समानता व सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांना संपवायला हवं. डास, डेंग्यू, मलेरिया आणि करोनासारख्या आजारांना विरोध केला जाऊ कत नाही. त्यांचं उच्चाटनच केलं जायला हव. त्याचप्रमाणे सनातन धर्माचंही व्हायला हवं”, असे धक्कादायक विधान उदयनिधी यांनी केले होते. तर, उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याला मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपूत्र प्रियांक खरगे यांनी दुजोरा दिला होता.
An FIR was registered against Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin & Karnataka Minister Priyank Kharge in Uttar Pradesh’s Rampur over ‘Sanatan Dharma’ remarks after a complaint from Advocates.
— ANI (@ANI) September 6, 2023
याप्रकरणी उदयनिधी आणि प्रियांक खरगे यांच्याविरोधात वकील हर्ष गुप्ता आणि रामसिंग लोधी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून दोघांवर मंगळवारी उत्तर प्रदेशातील रामपूर येथील सिव्हिल लायन्स पोलिस ठाण्यामध्ये धार्मिक भावना भडकवण्यासाठी हेतुपुरस्सर आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये,विविध धार्मिक गटांमधील वैर वाढवणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, उदयनिधी यांनी केलेल्या वक्तव्यावर गदारोळ उठला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपली भूमिका मांडत “मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरियासारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.