Election | Bollywood stars | Lok Sabha Election 2024 : काळानुसार निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये बदल होत आहेत. याआधी अनेक पक्षांचे उमेदवार सभेला गर्दी व्हावी म्हणून चित्रपट कलाकारांना बोलावत असत. मते मिळवण्यासाठी आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुपरस्टार्सबरोबर सभा आणि रोड शो करत असत.
मात्र, आता नेतेच स्टार झाले आहेत. तेच जनसंपर्क, सभा, रोड शो करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, यूपीचे मुख्यमंत्री योगी आणि इतर नेत्यांनी राज्यात सभा आणि रोड शो केले आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि राज्यातील अन्य नेत्यांच्या निवडणूक सभा झाल्या आहेत.
एकेकाळी चित्रपट कलाकारांचे ग्लॅमर हा चर्चेचा विषय असायचा. गेल्या काही वर्षांत, राजकीय पक्ष स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर करत असत, ज्यामध्ये चित्रपट कलाकारांची नावे देखील समाविष्ट होती.
आता स्टार प्रचारकांच्या यादीत चित्रपट कलाकारांना स्थान मिळत नाही. स्टार प्रचारकांच्या यादीत आता केवळ पक्षांचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत. दीड दशकापूर्वीपर्यंत लोक निवडणुकांमध्ये सिनेतारकांची वाट पाहत असत.
ही एकमेव संधी असायची जेव्हा लोकांना चित्रपट तारे जवळून पाहता येत असत. कलाकारांनी आपापल्या शैलीत चित्रपटातील संवाद म्हणून दाखवल्यावर सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदूमून जात असे.
हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा यांसारखे चित्रपट कलाकार मध्य प्रदेशात भाजपच्या व्यासपीठावर दिसत. ड्रीम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमा मालिनी स्टेजवर येताच ‘शोले’मधील डायलॉग्सना मागणी येत असे.
शत्रुघ्न जेव्हा मंचावरून आपल्या परिचित शैलीत खामोश असे म्हणत असत, तेव्हा लोकांचा उत्साह ओसंडून वाहायचा. राज बब्बर यांनी बराच काळ काँग्रेससाठी मते मागितली आणि सभाही घेतल्या.
सिनेअभिनेत्री नगमा आणि उर्मिला मातोंडकरही काँग्रेसच्या मंचावर दिसल्या होत्या, पण आता नेते स्टार आहेत… सुपरस्टार आहेत… त्यांची विधाने संवाद आहेत.