मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा काही दिवसांपूर्वीच आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्याशी साखरपुडा झाला. त्यामुळे सध्या परिणीती चर्चेत आली आहे. आता चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र लग्नाआधीच परिणीतीने एक नवीन सुरुवात केली आहे. परिणीतीने स्वतःचा व्यवसाय सुरू करत तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्राने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक चित्रपटात अभिनय करून सिनेसृष्टीत स्वत: एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अभिनयासह ती सुंदर गाणं देखील गाते. त्यानंतर आता तिने एक नवी इनिंग सुरू करणार असल्याचं जाहीर केले आहे. परिणीती चोप्रा एक उद्योजिका होणार असून लवकरच ती स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू करणार आहे. ‘त्रितीया’ असं या ज्वेलरी ब्रँडचं नाव आहे. या व्यवसायाद्वारे तिचे स्वप्न पूर्ण झाल्याचे म्हंटले आहे. हा व्यवसाय कंठी दत्त यांच्यासोबत ती सुरू करत आहे.
पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “गेल्या अनेक वर्षांपासून मला उद्योजक बनण्याची इच्छा होती. आता हे वर्ष माझे स्वप्न पूर्ण करत आहे हे पाहून मला खूप आनंद होत आहे. भव्य ‘त्रितीया ज्वेलरी’ सह माझ्या पुढील उपक्रमाची घोषणा करताना मला खूप आनंद होत आहे मी त्यांच्या डिझाईन्स पहिल्यांदा पाहिल्यापासूनच, मला ब्रँड अॅम्बेसेडरपेक्षा बरेच काही व्हायचे आहे हे समजले आणि या प्रवासात मी खूप आनंदी आहे. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि नियोजनानंतर कंठी दत्त आणि मी तुमच्यासाठी काही गोष्टी तयार केल्या आहेत.”
View this post on Instagram
पुढे तिने लिहिले की, “माझ्यासाठी हा उपक्रम केवळ दागिन्यांसाठी नाही, तर आम्ही आमच्या मनातून तयार केलेला आहे. मी खूप उत्सुक आहे. मी त्या क्षणाची वाट पाहत आहे, जेव्हा ह्या डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. मी अक्षरशः क्षण मोजत आहे! 8 सप्टेंबरला भेटूया!” येत्या ८ सप्टेंबर रोजी ती नवीन व्यवसायाला सुरुवात करणार आहे. तिच्या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.