Amit Shah Fake Video| केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र त्यांचा व्हिडिओ एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालय आणि भाजप नेत्यांकडून पोलिसांत तक्रार करण्यात आली. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये गृहमंत्र्यांना एससी/एसटी आणि ओबीसी आरक्षणावर भाष्य केल्याचे म्हंटल आहे. भाजपने या व्हिडिओबाबत एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. हा व्हिडीओ नेमका कुणी एडिट केला. तो सोशल मीडियावर कोणकोणत्या व्यक्तींनी व्हायरल केला, याची माहिती दिल्ली पोलिस करत आहे. पोस्ट केलेला व्हिडीओ डिलीट करणाऱ्या व्यक्तींचा देखील शोध घेतला जात आहे. दुसरीकडे भाजपने या एडिट केलेल्या व्हिडिओबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून देशभरात एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.
.@INCTelangana is spreading an edited video, which is completely fake and has the potential to cause large scale violence.
Home Minister Amit Shah spoke about removing the unconstitutional reservation given to Muslims, on the basis of religion, after reducing share of SCs/STs and… pic.twitter.com/5plMsEHCe3— Amit Malviya (मोदी का परिवार) (@amitmalviya) April 27, 2024
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. राजकीय नेते प्रचारसभा घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच अमित शहा यांच्या भाषणाचा व्हिडीओ एडिट करून अज्ञाताने सोशल मीडियावर व्हायरल केला. ‘SC, ST आणि इतर मागासवर्गीय (OBC) यांचं आरक्षण काढून टाकू,’ असं विधान अमित शाहांनी केल्याचे व्हायरल व्हीडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी भाजपवर टीका केली आहे. दुसरीकडे अमित शहा असे काही बोललेच नाही. हा व्हिडीओ बनावट असून भाजपविरोधात द्वेष पसरवण्याचं काम केलं जात असल्याचे आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. भाजपाने म्हटलं आहे की, हा मूळ व्हीडिओ तेलंगणातील असून मुस्लीम समाजाचे असलेले ४ टक्के असंवैधानिक आरक्षण काढून टाकू, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
दिल्ली पोलिसांनी फेसबुक आणि एक्सकडून माहिती मागवली
गृहमंत्र्यांच्या संपादित व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांनी एक्स आणि फेसबुकला पत्र लिहिले आहे. तसेच हा एडिट केलेला व्हिडिओ कोणत्या खात्यावर टाकण्यात आला आहे, याचीही माहिती दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मागवण्यात आली आहे.
हेही वाचा:
‘काँग्रेसचा मेंदू फुटलाय…’, बेंगळुरू कॅफे स्फोटाबाबत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल