Lok Sabha Election 2024 । देशात लोकसभा निवडणुकीतील पहिल्या दोन टप्पातील मतदान नुकतेच पार पडले आता तिसऱ्या टप्पातील मतदार संघात महायुतीसह महाविकास आघाडीकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात राम शिंदे यांचा प्रचारार्थ सभा सुरु आहे. या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा विरोधकांच्या आरोपावर प्रतिउत्तर दिल आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलाणार असा आरोप केला जात आहे. यावर आज सोलापूर येथे प्रचार सभेत बोलतांना नरेंद्र मोदी म्हणाले,’संविधानाला धक्का लागू देणार नाही’असं आमचे सरकार फक्त जनतेच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मोदींनी सोलापूरकरांना महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने विजय करा असे अवाहन केले. दरम्यान राम सातपुते यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कॉग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना रंगणार आहे.
हे वाचले का ? “पाच वर्षात पाच पंतप्रधान….” ; सोलापुरातून नरेंद्र मोदी यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल