MS Dhoni Historic Record In IPL : आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद ( Match No 46 ) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात एमएस धोनी फलंदाजीसाठी आला होता. धोनी नाबाद राहिला आणि त्याने 2 चेंडूत 5 धावा केल्या. धोनीला मैदानात येताना पाहून चाहत्यांना आपले पैसे वसूल झाल्यासारखे वाटले. आता धोनीने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून एक मोठी कामगिरी केली आहे. इतिहास रचत त्याने आयपीएलचा तो विक्रम आपल्या नावावर केला आहे, जिथे रोहित शर्मा आणि विराट कोहलीही पोहोचू शकले नाहीत.
खरं तर, धोनी आयपीएलच्या इतिहासात 150 विजयांचा भाग असणारा पहिला खेळाडू ठरला. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडूही आतापर्यंत या आकड्याला स्पर्श करू शकलेले नाहीत. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात धोनी एक खेळाडू म्हणून 150 व्या आयपीएल सामन्याच्या विजयाचा एक भाग बनला. या कालावधीत धोनी चेन्नई सुपर किंग्जसाठी 135 विजय आणि रायझिंग पुणे सुपरजायंटसाठी 15 विजयांचा एक भाग होता. चेन्नई संघावर 2016 आणि 2017 मध्ये बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे यादरम्यान धोनी सायझिंग पुणे सुपर जायंट संघाचा भाग होता.
आयपीएल सामन्यात सर्वाधिक विजयांचा भाग असणारे खेळाडू…
एमएस धोनी- 150 विजय
रवींद्र जडेजा- 133 विजय
रोहित शर्मा- 133 विजय
दिनेश कार्तिक- 125 विजय
सुरेश रैना- 125 विजय
IPL 2024 मध्ये आतापर्यंत धोनी आहे नाबाद…
एमएस धोनी आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत नाबाद आहे. कोणत्याही गोलंदाजाला त्याची विकेट घेता आली नाही. धोनीने आतापर्यंत सात डावांत फलंदाजी केली असून, त्यामध्ये त्याने 259.46 च्या स्ट्राइक रेटने 96 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी असीम आहे कारण तो एकदाही बाद झाला नाही. धोनीची सर्वोच्च धावसंख्या 16 चेंडूत 36* धावा होती, जी त्याने या मोसमात प्रथमच फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केली होती. आता उरलेल्या सामन्यांमध्ये त्याला कोणी बाद करू शकते की संपूर्ण मोसमात तो नाबाद राहतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.