Share Market 29 April 2024: सोमवारी (29 एप्रिल) सेन्सेक्स आणि निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. बँकिंग शेअर्समध्ये प्रचंड वाढ आणि आशियाई बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्सने आज 941 अंकांची उसळी घेतली. तर निफ्टी 22,600 च्या पुढे वाढला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज सुमारे 2.40 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बँक निफ्टीने 2 टक्क्यांहून अधिक उसळी घेत 49,473.60 चा उच्चांक गाठला. व्यापक बाजारपेठेत बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला आणि स्मॉलकॅप निर्देशांक सपाट बंद झाला.
व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 941.12 अंकांनी किंवा 1.28% ने वाढून 74,671.28 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 223.45 अंकांच्या किंवा 1% च्या वाढीसह 22,643.40 वर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी कमावले ₹2.40 लाख कोटी –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 29 एप्रिल रोजी 406.44 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, जे त्याच्या मागील ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 26 एप्रिल रोजी 404.04 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.40 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.40 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 26 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 4.67 टक्के वाढ झाली आहे. यानंतर इंडसइंड बँक, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि ॲक्सिस बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि 2.47% ते 3.09%पर्यंत वाढले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
तर सेन्सेक्सचे केवळ 4 समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही एचसीएल टेक शेअर्स 5.79 टक्क्यांच्या घसरणीसह सर्वाधिक घसरले. याशिवाय ITC, विप्रो, बजाज फिनसर्व्हचे समभाग 0.01% ते 0.44% पर्यंत घसरून लाल रंगात बंद झाले.
2,011 समभागांमध्ये वाढ झाली –
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर आज एकूण 4,088 शेअर्सचे व्यवहार झाले. यातील 2,035 शेअर्स वाढीसह बंद झाले. 1,877 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 176 समभाग कोणतेही चढउतार न होता समभाग बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 284 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. तर 11 समभागांनी त्यांच्या नव्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.