मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्राची चुलत बहीण आणि साऊथ अभिनेत्री मन्नारा चोप्रा नेहमीच दक्षिण चित्रपटसृष्टीत चर्चेत असते मन्नारा चोप्राचा ‘थिरागबदरा’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्याचबरोबर मन्नारा चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. मन्नारा चोप्रा नुकतीच तिच्या ‘थिरागबदरा’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये पोहोचली होती.
View this post on Instagram
कार्यक्रमादरम्यान दिग्दर्शक एएस रवी कुमार यांनी मन्नारा चोप्राला अचानक किस केले आणि ती थोडी अस्वस्थ झाली. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आणि यावरून सध्या मन्नारासह लोकांनी दिग्दर्शकाला खूप ट्रोल केले. अशातच किसिंगच्या वादावर मन्नारा चोप्राने व्हिडिओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मन्नारा चोप्रा तिच्या किसिंगच्या वादावर बोलताना दिसली. मन्नारा चोप्रा म्हणाली, ‘जे काही बातम्या येत आहेत त्याचा दिग्दर्शकाशी काहीही संबंध नाही. मला वाटते की, दिग्दर्शकाला माझे चित्रपटातील काम खूप आवडते. किसिंगच्या वादावर मन्नरा चोप्रा पुढे म्हणाली, ‘दिग्दर्शक जरा जास्तच उत्साहित झाले होते आणि मलाही आश्चर्य वाटले. की हे सर्व फक्त एक उत्साहाच्या भरात घडून गेले. कधीकधी लोक असे करतात आणि त्यांना ते लक्षात येत नाही. त्याचा हेतू चुकीचा होता असे मला वाटत नाही.’ असं म्हणत तिने किसींग व्हिडिओ आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दरम्यान, मन्नारा चोप्राने 2014 मध्ये ‘प्रेमा गिमा जांथा नई’ या तेलगू चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याच वर्षी ‘झिद’ या बॉलिवूड चित्रपटात ती दिसली. मन्नारा ‘संदामारुथम’, ‘जक्कन्ना’ आणि ‘सीता’मध्येही दिसली होती. तिचा ‘तिरगाबादरा सामी’ हा चित्रपट 15 सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर येणार आहे.